About Us

संस्थेचा इतिहास

संस्थेच्या स्थापने विषयी थोडेसे :

आपली संस्था अस्तित्वात येण्यापूर्वी सर्व न्यायालयीन बांधव सातारा जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतसंस्था या संस्थेचे सभासद होते. या संस्थेत महसूल, आरोग्य, कोषागार अाणि न्याय विभागातील शासकीय कर्मचारी सभासद होते. प्रत्येक विभागातील दोन-दोन कर्मचारी घेऊन संचालक मंडळ तयार केले जात असे. न्यायविभागातून मात्र कर्मचाऱ्यांना कसलीच कल्पना न देता वरिष्ठ प्रवर्गातील कर्मचाऱ्यांनाच संचालक पदावर पाठविण्यात येत असे. त्यामुळे न्यायालयातील इतर कर्मचाऱ्यांना संचालक मंडळावर स्थान आणि संधी मिळत नसे. ही वस्तुथिती अस्वस्थ करणारी होती. इतर विभागातील सभासद कर्मचारी कर्जाचे हफ्ते वेळेवर व वक्तशीरपणे परतफेड करीत नसत. त्यांच्यावर वसुलीची कारवाई न करता त्या त्या विभागातील संचालक हे त्या कर्मचाऱ्यांना पाठीशी घालीत असत. त्यामुळे महिन्याकाठी होणाऱा निधी कर्जवाटपासाठी अपूरा पडत असे. परिणामस्वरूप न्यायविभागातील कर्मचाऱ्यांची मासिक वसूली शंभर टक्के असतानाही न्यायालयीन कर्मचाऱ्यांना वेळेवर कर्ज मिळत नसे. त्यात आणखी भर म्हणजे सन् १९९७ - ९८ साली पहिल्यांदाच सातारा जिल्हा सरकारी नोकरांची पतपेढी या संस्थेची निवडणूक झाली. न्यायालयीन संघटनेने पुरुस्कृत केलेल्या उमेदवारांच्या पॅनलच्या प्रचारप्रमुखाची जबाबदारी संघटनेचे तत्कालीन उपाध्यक्ष श्री शब्बीर शेख यांच्यावर सोपविण्यात आली. त्यामुळे त्यांनी निवडणूकीतील गलिच्छ राजकारण, मतभेद, त्यातून निर्माण होणारी ईर्षा, मतदानावेळी होणारी गद्दारी प्रत्यक्ष अनुभवली. या सर्व अपप्रकारावर मात करत त्यांनी संघटना पुरुस्कृत पॅनेलला १००% यश मिळवून दिले. या सर्व प्रकारातून आपल्या विभागाची, कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांसाठी निःस्वार्थ भावनेने चालवलेली स्वतंत्र पतसंस्था असावी, कर्मचाऱ्यांना संचालक मंडळावर स्थान मिळावे, त्यांच्या ठिकाणी असणारी हुशारी व प्रशासकीय कुशलतेच्या गुणांना प्रेरणा मिळावी, कर्मचाऱ्यांना वेळेवर कर्ज मिळावे हे विचार, संघटनेचे तत्कालीन उपाध्यक्ष श्री शब्बीर शेख, स्वीय सहाय्यक, यांच्या डोक्यात घोंगावू लागले. आणि तेथेच संस्था स्थापनेचे बीज रुजू लागले. संस्थापकांनी आपल्या निवडक सहकाऱ्यांना आपला विचार सांगितला आणि पटवून दिला. आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन मुख्य प्रवर्तक म्हणून प्रत्यक्ष संस्था नाेंदणीच्या कामास सुरुवात केली. समविचारी आणि संस्था स्थापनेच्या कामात मदत करणाऱ्या, पाठिंबा देणाऱ्या कर्मचाऱ्यांमधून प्रवर्तक संचालक निवडले आणि आवश्यक असणारे सभासद गोळा करणेस सुरुवात केली.More...Please click here---->

 

Chairman and Vice-Chairman's List from 2002
चेअरमन व व्हाईस चेअरमन यादी (सन २००२ पासुन)

Duration Chairman Vice-Chairman
2002 to 2004
Shri. Shabbir Jamadar Shaikh
Sou. Shubhada Vasudeo Gosavi
2004 to 2005
Shri. Shivaji Tanaji Ingale
Shri. Sopan Ramchandra Jadhav
2005 to 2006
Shri. Milind Bhanudas Mote
Shri. Suresh Shankar Shinde
2006 to 2007
Shri. Dilip Sarjerao Nikam
Shri. Budhanand Piraji Waghmare
2007 to 2008
Shri. Chitrasen Shankar Shinde
Shri. Sudhir Shankar Majagaonkar
2009 to 2010
Shri. Ratankumar Mahadeo Shilamkar
Sou. Sunita Subhash Kadam
2010 to 2011
Shri. Dilip Sarjerao Nikam
Shri. Shantaram Tulashidas Shinde
2011 to 2012
Shri. Dilipkumar Maruti Waghmare
Shri. Ramchandra Pandurang Gorad
2012 to 2014
Shri. Dilip Sarjerao Nikam
Shri. Jitendra Ramchandra Bartakke
2014 to 2015
Shri. Makarand Sudhakar Gadre
Shri. Hindurao Baliram Dhumal
2015 to 2016
Shri. Ratankumar Mahadeo Shilamkar
Shri. Sanjay Vitthal Kengar
2016 to 2017
Shri. Sachin Shrirang Pawar
Shri. Ramchandra Baban More
2017 to
Shri. Satish Sopan Jadhav
Shri. Sajid A. Sayyad

 

Founder Board of Directors
प्रवर्तक संचालक मंडळ

Sr. No. Name
1
Shri. Sabbir Jamadar Shaikh
2
Sou. Shubhada Vasudeo Gosavi
3
Shri. Chitrasen Shankar Shinde
4
Shri. Sudhir Shankar Majagaonkar
5
Shri. Milind Bhanudas Mote
6
Shri. Dilip Sarjerao Nikam
7
Shri. Suresh Shankar Shinde
8
Shri. Sopan Ramchandra Jadhav
9
Shri. Shivaji Tanaji Ingale
10
Shri. Budhanand Piraji Waghmare
11
Sou. Aparna Sarjerao Pawar